जिल्हयातील समित्याच्या बैठकीत 250 ग्रामपंचायत मध्ये गावभेट दौऱ्याचा निर्णय..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: कोकण रेल्वे प्रवाशांच्या न्याय मागण्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाकडे गेले वर्षभर मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उद्याच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत प्रवाशी जनतेचा कौल घेण्याच्या तयारीत जिल्ह्यातील या समित्या असून येत्या गुढीपाडव्यानंतर प्रत्येक रेल्वे प्रवासी समितीच्या माध्यमातून याबाबत गाव भेट दौऱ्याचे नियोजन करण्यात यावे या दृष्टीने कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले .
सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक समन्वय समितीचे निमंत्रक सल्लागार ॲड. नंदन वेंगुर्लेकर , अध्यक्ष शुभम परब सचिव प्रकाश पावसकर ,कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा प्रवासी समित्या कार्यरत असून या प्रवासी समित्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रश्नाबाबत सातत्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले. कोकण रेल्वेच्या नावाखाली अन्य राज्यांना त्याचा फायदा होतो याबाबत सिंधुदुर्गातील प्रवासी समित्यांच्या माध्यमातून प्रखर लढा उभारणे गरजेचे आहे ,सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता असून केंद्रातील मंत्री आणि खासदार यांचे हे लक्ष वेधण्यात आले होते परंतु अजूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही प्रवाशांच्या या प्रश्नाबाबत या लोकनेत्यांना त्याची जाणीवही नसल्याचे दिसून येते त्यामुळे याबाबत त्यांना जाणीव करून देण्यासाठी आपल्याला प्रखर निर्णय घ्यावा लागेल असे समित्यांच्या माध्यमातून मांडण्यात आले त्यामुळे उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कोणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार असून दे आपले रेल्वे प्रवाशांचे प्रश्न हे सामूहिक प्रश्न आहेत जनतेच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ना याची जाणीव करून देण्यासाठीया निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असे सुतोवाच्या आजच्या बैठकीतअनेकांनी उपस्थित केले ,त्यामुळे उद्याच्या या गुढीपाडव्यानंतर प्रत्येक रेल्वे प्रवासी समित्यांच्या माध्यमातून पंचक्रोशी गाव भेट दौरा आयोजित करून त्या त्या गावातून “रेल्वेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही तर मतदान नाही ” याबाबत जनमत कौल घेऊन त्या दृष्टीने निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले , त्यामुळे उद्याच्या गुढीपाडव्यानंतर हे गाव भेट दौऱ्याचे आयोजन करावे असे समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्टेशन जवळील 20 ते 25 गावांमध्ये जनतेच्या घरोघरी जावून रेल्वेबाबत विविध अडचणी, यातना, समस्या याचे नागरिकांकडून लिखित स्वरूपात संकलन करून लवकरच संघर्ष समितीच्या वतीने PMO ऑफिस, नवी दिल्ली व रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडे प्रत्यक्ष जाऊन सुपूर्द करण्याचे एकमताने ठरविण्यात आले..
तसेच निष्क्रिय कोकण रेल्वे सल्लागार समितीची पुनर्रचना तातडीने करण्यात यावी अशी प्रमुख मागणी जिल्हावासियांकडून जोर धरत आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुक्रमे चिंचवली, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडूरा अशी १० रेल्वे स्टेशन असून त्यापैकी रेल्वे स्टेशनवर मागील २५वर्षात फक्त एकाच दिवा पॅसेंजर गाडीला थांबा आहे, सदरील बाब अतिशय गंभीर असून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हावासिय च्यावतीने निषेधही नोदविला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे ट्रॅक वरून जाणाऱ्या जवळपास १६ गाड्यांना एकही थांबा नाही ,१० रेल्वे स्टेशन पैकी एकही ठिकाणी थांबा नाही हा आमच्या कोकण वासियांचा आम्ही अपमान समजतो त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन आणि भारतीय रेल्वे बोर्डाने कोकणी लोकांच्या अडचणींवर पुढील काही दिवसात उपाय योजना न काढल्यास वेळ प्रसंगी स्थानिकांच्या उद्रेकाला सुस्त आणि मुजोर प्रशासनाला सामोरे जावे लागेल..
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती, सिंधुदुर्ग निश्चित करण्याचे ठरविण्यात आले या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश पावसकर ,सचिव मीहीर मठकर यांची एक मताने निवड करण्यात आली तर सर्व रेल्वे स्टेशन प्रवासी समित्यांचे अध्यक्ष शुभम परब , सागर तळवडेकर ,संतोष कांदळकर किशोर जैतापकर गुरुदास गवंडे यासहपदसिद्ध उपाध्यक्षपदी राहतील ,कार्याध्यक्ष लिलाधर अणावकर , सहसचिव अजय मयेकर , संजय वालावलकर तर खजिनदार साईनाथ आंबेरकर सहखजिनदार नागेश ओरोसकर , स्वप्नील गावडे , तांत्रिक सल्लागार सुभाष शिरोडकर , जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली , शेवटी ऊपस्थीताचे आभार मानले [सोबत फोटो
