माजी सरपंच प्रकाश गावडे : रोणापाल येथे 25 दात्यांनी केले रक्तदान..
⚡बांदा ता.०५-: रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अनेकांचे जीव या रक्ताच्या साहाय्याने वाचवले जातात. मात्र रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत ते दूर होणे गरजेचे आहे. जे लोक दरवर्षी गरजुंना आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करतात अशांचा योग्य सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन रोणापाल माजी सरपंच तथा श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापालचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले.
श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापालतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात श्री. गावडे बोलत होते. यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान गोवा जीएमसी ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर, ग्रामपंचायत सदस्य नंदू नेमण, सामाजिक कार्यकर्ते राजन परब, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, मंडळ सचिव विष्णू सावंत, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाबल तुयेकर, डॉ. सागर जाधव, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 15 ते 20 जणांना वाढत्या उष्म्यामुळे रक्तदान करता आले नाही. दर तीन महिन्यांनी रक्तदान करणारे अशोक परब यांचा मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. डॉ. मयुरेश पटवर्धन तसेच संजय पिळणकर, उल्हास परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, अनिल खाडे, राहुल जाधव, परशुराम गावडे, न्हानू गावडे, मंगेश गावडे, बाळू तुयेकर, सुदिन गावडे, अभय कापरे, ऋषिकेश कुंभार, उदय गावडे, वामन गावडे, निलेश नाईक, नारायण नाईक, तानाजी धर्णे, बापू धर्णे, किशोरी नाईक, वनिता गावडे, सागर गुरव, अतुल पाटील, तेजस शाह, कल्पेश नाईक, सचिन कुबल, अमित गावडे, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. एकूण 25 दात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गावडे यांनी केले. प्रस्ताविक व स्वागत सुदिन गावडे यांनी तर आभार राजन परब यांनी मानले.
