२१ व २२ एप्रिलला आयोजन ; दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.०५-: साटेली खालचीवाडी येथील श्री देव महापुरुष देवस्थानचा संप्रोक्षण विधी सोहळा 21 व 22 एप्रिल रोजी होणार आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी सकाळी ७ ते १ या वेळेत यजमान,प्रायश्चित, शरीरशुद्धी, गणपती पूजन,पुण्याहवचन,मातृका पूजन,नांदीश्राद्ध,आचार्यवरण, प्राकारशुद्धी हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर नंतर दुपारी १ ते २ पर्यंत आरती व महानैवेद्ध होणार आहे. तर रात्रौ ९ वाजता. सप्तरंग कला मंच होडावडा यांच्या स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित महान प्रौराणिक संगीत दोन अंकी ट्रिकसिन युक्त “महाब्रंम्हाडनायक” हा नाट्यप्रयोग होणार आहे.
दुसर्या दिवशी सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रसाद नंतर स्थानिक कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे महापुरुष कला क्रीडा मंडळ साटेली खालचीवाडी यांनी केले आहे.
