Headlines

उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त १० रोजी रक्तदान शिबीर…

दर्पण प्रबोधिनी संस्थेच्यावतीने आयोजन..

⚡कणकवली ता.०५-: दर्पण प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक, विद्रोही साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे बुधवार १० एप्रिलाला सकाळी ८ वा. येथील एकदंत प्लाझा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सचिव सुभाष कदम यांनी केले आहे. शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ.अशोक कदम (9422373590) संदेश कदम, राहुल कदम, विशाल कासले, गौरव कदम, अजित तांबे, प्रकाश किर्लोस्कर यांच्याशी संपर्क साधावा.
उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गेली ५वर्षे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. उत्तम पवार यांचा १० एप्रिल हा जन्मदिवस आहे. एका दुर्दैवी अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून रक्तदान शिबीर आयोजित करून संस्थेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page