⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवासी जयसिंगराव दौलतराव सुर्वे (वय ५८ वर्षे) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना गोवा बांबूळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्यामुळे गुरुवारी त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. तेथेच गुरुवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. येथील रामेश्वर प्लाझा येथे असलेल्या जगन्नाथराव पेडणेकर ज्वेलर्समध्ये ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत होते. तत्पूर्वी काही वर्षे सावंतवाडीतील दैनिक प्रहार कार्यालयात देखील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी, सून असा परिवार आहे.
खासकीलवाडा येथील रहिवासी जयसिंगराव सुर्वे यांचे निधन…
