केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभा प्रमुख राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले विशेष प्रयत्न..
⚡सावंतवाडी ता.१०-: गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्नाबाबत प्रयत्न केलेल्या भाजपा व युतीच्या सर्व नेते व पदाधिकारी यांचे समस्त सावंतवाडीकरांच्यावतीने भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आभार व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे, पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून व सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री राजन तेली तसेच माजी नगराध्यक्ष श्री संजू परब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.
