मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: केसरकारांमुळे सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामांना चालना..
⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्गाच्या पर्यटन वाढीवसाठी लवकरच ग्रीनफिल्ड हायवेचे काम हाती घेणार अशी घोषणा घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.दरम्यान
सावंतवाडी शहर व सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरातील विकासासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या भागात विकास कामांना गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
ते सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या 51 व राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात बोलत होते. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील दीडशे कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
