उबाठा शिवसेनेचे उद्याचे आंदोलन स्थगित:रुपेश राऊळ यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर मुदतीच्या आधीच काढण्यात आल्याने आज ठाकरे सेनेच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला होता. यावेळी बॅनर न लागल्यास उद्या आम्ही नगर पंचायत समोर आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ ते बॅनर पुन्हा लावल्याने उद्या होणारे ठाकरे सेनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याने ठाकरे सेनेचे बॅनर मुदतीच्या आधीच काढण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे सेनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेला घेराव घालत जाब विचारला होता. यावेळी आपण ते बॅनर पुन्हा लावण्याचे प्रयत्न करू असे मुख्याधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा तालुकाप्रमुख यांनी दिल्यानंतर सायंकाळी उशिरा ते बॅनर पुन्हा लावण्यात आल्याने ठाकरे सेनेच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
