ओरोस ता ६
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. काजू प्रक्रिया उदयोगाच्या समस्या जाणून घेणे तसेच काजू प्रक्रिया उदयोगाकरिता काजू बी आयात करणे बाबतची कार्यवाही नियोजित आहे. त्या दृष्टीने काजू प्रक्रियादारांची माहिती संकलित करणे करिता सभा ८ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक ११.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग चे सभागृह येथे आयोजित केली आहे.
या सभेस महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी उपसरव्यवस्थापक मिलींद जोशीव जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरीही सिंधुदुर्गातील काजू प्रकीयादार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग बाजार समितीद्वारे करण्यात आले आहे.
