सावंतवाडी खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे यांचा आरोप
सावंतवाडी,दि.३० डिसेंबर ( प्रतिनिधी)
पणन हंगाम २०२३-२४ मधील खरीप भात धान खरेदी करता शेतकरी नोंदणीस मुदतवाढ १५ जानेवारी पर्यंत देण्यात आली आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग अधिकारी डि आर पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी मुळ मुद्द्याला बगल दिली आहे असे म्हटले आहे.
पणन हंगाम २०२३-२४ मधील खरीप भात धान खरेदीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर पर्यंत होती. संदर्भिय शासन आदेशनुसार ऑनलाईन शेतकरी नोंदणी करिता दि. १५ जानेवारी पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त शेतक-यांची नोदणी करण्यात यावी व हमीभाव खरेदीपासून जिल्हयातील शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेऊन शेतकरी नोंदणी विहित वेळेत पूर्ण करावयाची आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी डि आर पाटील यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे म्हणाले, हमीभावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी १५ जानेवारी पर्यंत करता येईल. मात्र खरीप हंगामात पावसाचे वेळापत्रक कोलमडले होते तसेच नेटवर्क अभावी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले त्यामुळे किमान गतवर्षी भात पीक कापणी व नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना भात पीक शासकीय हमीभावाने विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
श्री . गावडे म्हणाले,शेतकऱी हमीभावापासून वंचित राहणार नाहीत, म्हणून खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी कागदी घोडे नाचवत बसण्यापेक्षा शेतकरी वंचित राहू नये म्हणून संवाद साधला पाहिजे होता. तरच खरी अडचण लक्षात येईल तरीही भात पीक शासकीय हमीभावाने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी महसूल विभागाशी संपर्क साधला पाहिजे त्यातून निष्पन्न झाले तर जास्तीतजास्त शेतकरी भात पीक शासकीय हमीभावाने विक्री करू शकतील.
दरम्यान प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचें लक्ष याकडे वेधले असता आपण याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी चर्चा करतो असे त्यांनी सांगितले.
फोटो
