सावंतवाडी : निवृत्त शिक्षकांना पुन्हा शिक्षक पदावर नियुक्ती दिली जात आहे अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ येत आहे.डीएड बिएड झालेल्या तरुणांच्या जखमेवर सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. अशा धोरणामुळे बेरोजगार डीएड बीएड उमेदवारांच्या भविष्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी खंत माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केली आहे.
तळवणेकर यांनी म्हटले की, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींवर वर बेरोजगारीची आपत्ती आली आहे. या शासनाच्या कृतीमुळे हसावे व रडावे हेच कळत नाही. शिक्षक भरतीबाबत तरुण डीएड, बेरोजगार आंदोलन करत आहेत. परंतु हल्लीच शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 3873 शाळामधून 1162 रिक्त पदांपैकी 53 पदे निवृत्त शिक्षकातून भरलेली आहेत. त्यामुळे तरुण बेरोजगारांवर उपासमारीची आपत्ती आली आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ : मंगेश तळवणेकर…
