श्लोक पठण स्पर्धेला मोठा प्रतिसादामुळे आयोजकांना देखील मोठी प्रेरणा मिळते…

अभिमन्यू लोंढे: श्लोक पठण स्पर्धेत शानदार उद्घाटन.

सावंतवाडी ता.३०-: जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग दर्शवल्यामुळे आयोजकांना देखील असे कार्यक्रम करायला मोठी प्रेरणा मिळते असे गौरवी उदगार सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी काढले. दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात, यात पालकांनी, मुलांनी सहभाग नोंदवावाअसे आव्हान देखील श्री लोंढे यांनी यावेळी केले.

येथील सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचं विजय नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ते पुढे बोलतान लोंढे म्हणाले की, आज कालच्या जगात मोबाईलमुळे अनेक युवा वर्ग अशा स्पर्धेमध्ये सहभाग कमी नोंदवतात. परंतु आज विद्यार्थ्यांनी व विशेषता पालकांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे देखील मी अभिनंदन करतो. त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेंना सहभाग दर्शवण्यासाठी यापुढे देखील पुढाकार घ्यावा असेही अभिमन्यू लोंढे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धेमध्ये भाग घेताना विजयाची आशा न बाळगता आपले श्लोक कशाप्रकारे सादर करताल याकडे लक्ष द्यावा असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, तालुका खजिनदार मयूर चराठकर, रामचंद्र कुडाळकर, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, निलेश मोरजकर, हर्षवर्धन धारणकर प्रवीण परब, भुवन नाईक, सिद्धेश नाईक, कौस्तुभ पेडणेकर प्रसन्न गोंदावळे,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page