दिलीप हिंदळेकर, राजेश सरकारे, मिलिंद डोंगरे ,मुदस्सर शिरगावकर व पिंट्या जाधव मानकरी…
⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार पत्रकार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर यांना, स्व. शशी तायशेटे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राजेश सरकारे यांना तर स्व. अनिल सावंत ग्रामीण आदर्श पत्रकार पुरस्कार मिलिंद डोंगरे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच कणकवलीतील एम्पायर रियल इन्फ्रा प्रा.लि. बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स ग्रुपचे मुदस्सर शिरगांवकर यांची यशस्वी उद्योजक म्हणून तर रुग्णवाहिका चालक पंढरी उर्फ पिंट्या जाधव यांची सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शनिवारी कणकवली तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत या पुरस्कारांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, अशोक करंबेळकर, पत्रकार समितीचे सचिव माणिक सांवत, खजिनदार योगश गोडवे, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, पत्रकार सुधीर राणे, लक्ष्मीकांत भावे, नितीन कदम यांच्यासह तालुका पत्रकार समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत जानेवारीच्या अखेरीस घेण्याचे ठरवण्यात आले. या कार्यक्रमात बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणार्या कलमठमधील सौ. तन्वी शिरगांवकर यांचाही गौरव केला जाणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाच्या सुचनेनुसार घटना दुरुस्तीच्या मसुद्यावर चचार्र् करून सुचना घेण्यात आल्या. सर्व पत्रकार सदस्यांनी आपली वार्षिक फी लवकरात लवकर जमा करून पत्रकार समितीला सहकार्य करावे, 6 जानेवारीच्या पत्रकार दिन सोहळ्याला पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत यांनी केले.
