मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या प्रयत्नाना अखेर यश..
⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी शहरातील चितारआळी परिसरातील हॉटेल गोमंतक पॅराडाईज नजीक असलेले उघडे गटार नगरपालिकेने त्यातील चिखल काढत पाण्याचा बंब लावत स्वच्छ केले. या गटारातून दुर्गंधी येत असल्याने ते स्वच्छ करावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्याधिकारी यांच्याजवळ केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल आहे.
हे गटार पूर्णतः चिखलाने भरले असल्याने त्यातून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हे गटार साफ करून दुर्गंधी घालवावी अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी दुजोरा देत दोन दिवस आधी गटारातील चिखल काढून देऊन साफसफाई करून आज त्या गटारामध्ये पाण्याचा बंब लावून नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी गटार स्वच्छ करून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत अनिकेत दळवी, रोहन राऊळ, भावेश माळी आदी उपस्थित होते.
