मालवणात १ ते ३ रोजी मतदार यादी पुनरीक्षण शिबीर

⚡मालवण ता.२९-: भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यकम, २०२४ च्या कार्यक्रमास दि. १ ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत मतदारांची वगळणी याकरीता मुदतवाढ दिलेली असून सदर कालावधीत मालवण तालुक्यातील पात्र व्यक्ती मतदार नोंदणी करु शकतात. त्याअनुषंगाने मालवण शहराकरीता नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत मतदारांची वगळणी याबाबत तलाठी कार्यालय, मालवण (दैवज्ञ भवन हॉल समोर) येथे दि. १ ते ३ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये मतदार यादी संदर्भातील मतदार यादीत नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती करणे, मयत मतदार यांच्या नोंदी वगळणे इत्यादी बाबत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तरी पात्र मतदारांनी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page