भाजप नेते निलेश राणे यांचा इशारा;पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्यासमवेत मांडला ठिय्या…
⚡कुडाळ ता.२९-: आपण आतापर्यंत कधीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कधीच विरोध केला नाही. आमच्या नेत्यांच्या नावाला असा विरोध होत असेल तर आपण जिल्ह्यात एकाही विकासकामांचे भूमिपूजन होऊ देणार नाही. मग ती कामे, विषय खासदारांचे असो अथवा आमदार यांचे असो आपण स्वस्थ बसणार नाही अशा इशारा भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांच्या समवेत कुडाळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या चर्चेवेळी देत यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्यासमवेत ठिय्या मांडला.
