Headlines

आशिष सुभेदार यांची उचल बांगडी नव्हेच;तर राजीनामा दिला…

मनसेचे मंदार नाईक व निलेश देसाई यांचा दावा: नवीन निरीक्षक व नवीन  पदाधिकाऱ्यामुळे पक्षाची हानी.._*

⚡सावंतवाडी ता.२९-: आशिष सुभेदार यांनी 13 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता असे असताना त्यांची उचल बांगडी झाल्याचे बातमी प्रसिद्धीला देण्यात आली आहे, ती हास्यास्पद आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आशिष सुभेदार यांच्या पाठीशी राहू तो जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही राहणार आहोत असे मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक व मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा सचिव निलेश देसाई यांनी म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून वारंवार गटबाजीमुळे आणि तक्रारीच्या गलिच्छ राजकारणाला आमचा विरोध होता. त्यामुळे आम्ही राजीनामा सर्वांनी दिला. परंतु कुठेही आम्ही प्रसार माध्यमांसमोर गेलो नाही मात्र आता बातमी प्रसिद्ध उचल बांगडी झाल्याची बातमी प्रसिद्धी करण्यात आली आहे.हे हास्यास्पद आहे. मनेस जिल्हा पक्ष निरीक्षक आणि त्यांनी नेमलेली पदाधिकारी अकार्यक्षम असल्यामुळे पक्षाची हानी होत आहे असे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page