राजन तेली:निरवडे कोनापाल- बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ..
⚡सावंतवाडी ता.२९-: निरवडे गावाच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही. तुम्ही केव्हाही निधी मागा मी द्यायला तयार आहे, अशी ग्वाही आज येथे माजी आमदार राजन तेली यांनी दिली.
निरवडे कोनापाल- बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच तथा सावंतवाडी खरेदी- विक्री संघ माजी चेअरमन प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे, ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव, संदीप पांढरे, संतोष गावडे, मोहन बांदिवडेकर, संदीप पायनाईक, दादा बांदिवडेकर, काका बांदिवडेकर, सुहास गावडे, दिनकर गावडे, शरद बांदिवडेकर, मोहन सावंत, विजय धारगळकर, दिनेश जाधव, गजानन बांदिवडेकर, मंगेश कोनापालकर, मिलिंद गावडे, औदुंबर बांदिवडेकर, मदन बांदिवडेकर, संदीप नाईक, विजय सावंत, बाळा सावंत, सुरज पायनाईक, सचिन मुळीक आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून आणि प्रमोद गावडे यांच्या प्रयत्नातून निरवडे कोनापाल बांदिवडेकर वाडी जाणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे तर याच रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. तसेच गावातील कोनापाल सातेरी मंदिर रस्ता, निरवडे-देऊळवाडी येथे साकव, निरवडे-वेत्ये रस्ता अशी बरीच कामे मंजूर झाली आहेत. त्या सुद्धा कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रमोद गावडे यांनी यावेळी दिली. तर गावातील विकास कामांना निधी देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आणि तेली यांचे त्यांनी आभार मानले. यापुढे सुद्धा गावासाठी निधी द्या, अशी मागणी केली. यावेळी गावाच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या, अशी ग्वाही तेली यांनी दिली. यावेळी तेली यांचे स्वागत सरपंच सुहानी गावडे यांनी तर आभार प्रमोद गावडे यांनी मानले.
