⚡मालवण ता.२९-: थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन जन्म दिनानिमित्त येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात Mathematics for Everyone! या सदराखाली गणित विभागामार्फत आयोजित ‘गणितोत्सव २०२३’ संपन्न झाला.
हा गणितोत्सव गणित विभागप्रमुख प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. या सप्ताहाच्या सांगता समारंभाला विशेष आकर्षण म्हणून आदेश बर्डे (तेंडोली, ता. कुडाळ) यांनी मांडलेले प्राचीन काळापासून ते आतापर्यंत चलनात आलेली नाणी, नोटा आणि टपाल तिकीट यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सप्ताहात गणितीय संकल्पनाचा वापर करून Game of Maths ladder master यासारख्या मनोरंजनात्मक खेळाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी १०० पर्यंत पाढे पाठ करून त्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांनी प्रोत्साहन दिले. संस्थेचे उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन सुधीर वराडकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संस्था सल्लागार दीपक पेणकर, माजी मुख्याध्यापक पाटील आदी उपस्थित होते.
नाणी, नोटा प्रदर्शन उद्घाटन डॉ. सोमनाथ परब व रामानुजन जयंती दिवशी गणित अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष वामन खोत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्याध्यापक संजय नाईक यांनी गणित शिक्षकांना प्रोत्साहित केले. प्रकाश कानुरकर यांच्या संकल्पनेतून व सहकारी शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, विश्वस्त अॅड. एस. एस. पवार व पदाधिकारी, संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.
