रुपेश पावसकर यांचा राजीनामा: संपर्कप्रमुखांकडे राजीनामा सुपर्द…
⚡कुडाळ ता.१६-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
सध्या ठाकरे गटातून जोरदार आऊटगोईंग सुरू असून हा कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. रुपेश पावसकर यांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मनधरणी सुरू होती. परंतु, आज (गुरुवारी) रुपेश पावसकर यांनी आपला राजीनामा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटात आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच रुपेश पावसकर कोणत्या पक्षात प्रवेश करतात हा चर्चेचा विषय बनला आहे.
