झाराप- पत्रादेवी महामार्गावरील घटना: अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारने दिली धडक..
⚡सावंतवाडी ता.१७-: अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने समोरील चार चाकी ला वाहनाला धडक दिल्याने झालेले अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रिज येथे घडला. दरम्यान सुधी आणि या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
