पहाटेची घटना:सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत नाही..
⚡बांदा ता.१७-: बांदा नेतर्डे रस्त्यावर फकीरफाटा येथे दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो रस्त्यालगतच्या घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. स्थानिकांनी अन्य वाहनांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढला. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
हा अपघात पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त टेम्पो चालक दूध, दहीची गोव्यातून बांद्यात वाहतूक करत होता. नेतर्डे रस्त्यावर भरधावं वेगात टेम्पोचे ब्रेक निकामी झालेत. त्यामुळे गाडी न आवरल्याने टेम्पो थेट रस्त्यालागत घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले. येथील युवक सिद्धेश केणी यांच्यासह स्थानिकांनी चालकाला बाहेर काढत टेम्पो देखील सुखरूप बाहेर काढला. सकाळच्या वेळी या रस्त्यावर राहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
