कणकवली नाथ पै नगर येथे डासप्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.१६-: दिवाळीनिमित्त कणकवली शहरातील बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाने नाथ पै नगर, जळकेवाडी परिसर डासमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मशीनद्वारे परिसरातील डास मारण्यासाठी धूर, फवारणी केली जाणार आहे. शुभारंभप्रसंगी प्रवासी संघाचे तालुका अध्यक्ष मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक संघ तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर, एस. एल. सपकाळ, अमोल रासम, अनिल परब, अमित मयेकर, प्रशांत कुडतरकर, नीलेश राणे, योगेश मुंज, मिथिलेश जोगळे, मंगेश राणे, स्वप्नील पांगे आदी उपस्थित होते.

मलेरिया, डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता मंडळाने डासप्रतिबंधक फवारण्याची मशीन केली खरेदी केली असून त्याद्वारे परिसरात फवारणी केली जाणार आहे.

You cannot copy content of this page