बांदा येथे शिक्षक दिनानिमित्त पतंजली सिंधुदुर्ग तर्फे योग शिबिर संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे सकाळी 7 ते 8:30 पर्यंत गोगटे वाळके महाविद्यालय पानवळ-बांदा येथे एक दिवसीय विशेष योग शिबिर घेण्यात आले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. रमाकांत गावडे, प्रा. जोशी आणि सहकारी यांनी योगशिबिर होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या मागणीनुसार विशेष शिबीर ठेवण्यात आले होते. पतंजली योगसमिती सिंधुदुर्गचे सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांनी योगवर्ग घेतला. सुक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, आसने आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला. निरंतर योगसाधना करणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करावा असे शेखर बांदेकर यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले.

You cannot copy content of this page