समाजाच्या उत्कर्षासाठी नव्या पिढीला जागृत करा…

महेश परुळेकर; बांदा येथे भटके विमुक्त दिन साजरा

बांदा/प्रतिनिधी
भटक्या विमुक्तांचा खरा इतिहास हा शूरवीरांचा व पराक्रमांचा आहे. आम्ही शुर वीर आसूनही गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे जिणे जगत आलो आहोत. कारण आमचा खरा इतिहास कधी आमच्या समोरच येऊ दिला नाही. पण आता येथे थांबून चालणार नाही कारण आता आम्हाला आमच्या उत्कर्षाचा इतिहास नव्याने लिहायचा आहे. त्यासाठी बांधवांनो आपल्याला व आपल्या नव्या पिढीलाही जागरूक केले पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी डिंगणे बांबरवाडी येथील धनगर बांधवांना भटके विमुक्त दिनाबाबत माहिती देताना केले.
सदरील कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा शाखेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे या गावी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश परुळेकर होते. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर, पत्रकार रामदास जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सावंतवाडी तालुका पदाधिकारी यासह ग्रामस्थ जानू खरात, भगवान खरात, सोनाली सोनू खरात, मंगल गंगाराम खरात, जयश्री जनार्दन खरात, चिमणी सोनू खरात, मनीषा भगवान खरात, प्राची गोया शिंदे, शाली गोय शिंदे, आकाश शिंदे वंदना खरात, अनिशा शिंदे, गौरी शिंदे, बाळकृष्ण शिंदे, साक्षी शिंदे, आर्यन शिंदे, तन्वी शिंदे, सुरू खरात, साक्षी शिंदे, संदेश खरात, वसहील शिंदे, ओंकार खरात, नागेश खरात, जानवी शिंदे, प्रशांत शिंदे, प्रांजल खरात आदी उपस्थित होते.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमातील भटका विमुक्त दिन वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील धनगर वस्तीमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात, तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी प्रास्ताविक करून केले. यानंतर इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासाठी निर्माण होत असलेल्या अडचणी व त्यावर कश्या प्रकारे मात केली जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या जातीच्या तसेच उत्पन्नाच्या दाखल्या बाबत, तसेच एकंदरीत शासकीय योजनांचे, युवकांना रोजगारावर मार्गदर्शन महिलांच्या रोजगाराबाबत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आभार विजय शेर्लेकर यांनी मानले.
फोटो :-
डिंगणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटका विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page