बांद्यात किंग कोब्रा जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले…

बांदा/प्रतिनिधी
बांदा गावातील सर्पमित्र राजा खान यांनी पानवळ येथे घरात शिरलेल्या किंग कोब्रा जातीच्या नागाला शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
आजवर अनेक सर्पांना राजा खान यांनी जीवदान दिले आहे. बांदा तसेच बांदा शहराच्या लगतच्या गावांमधून राजा खान यांना नेहमी बोलवण्यात येते. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून खान हे नेहमी लोकांची मदत करत असतात. शासनाने अशा सर्पमित्रांची दखल घेणे आवश्यक असून राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस असलम खतीब यांनी यासाठी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे याकडे लक्ष वेधले आहे.
याची दखल घेत शासन दरबारी सर्पमित्राना योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन अबीद नाईक यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page