सिंधुदुर्गातील संस्थांसाठी कुडाळ येथे १० रोजी ‘सिंधुदुर्ग समिट’ चे आयोजन

⚡मालवण ता.०६-: कोकण एनजीओ फेडरेशन या शिखर संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, देवस्थान संस्था, सहकारी संस्था यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने “सिंधुदुर्ग एनजीओ समिट – २०२३”चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन हेमंत राठी (चेअरमन एम्पायर स्पायसेस अँड फुडस लिमिटेड, राम बंधू मसाले आणि संचालक- सरस्वत बँक) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सौदागर (कर सल्लागार तथा संचालक – सरस्वत बँक) उपस्थित राहणार आहेत. तर श्री. अशोक सारंग – कर सल्लागार, श्री. सागर तेली साहेब – कर सल्लागार, फेडरेशनचे अध्यक्ष श्री. अविनाश पराडकर, कार्याध्यक्ष श्री. भालचंद्र राऊत, उपाध्यक्ष श्री. दीपक कुडाळकर, खजिनदार श्री. निखिल वस्त या विशेष अतिथींच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या संस्थांसाठी नीती आयोग (भारत सरकार) नोंदणी मोफत करून देण्यात येणार आहे. यावेळी संस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहून मार्गदर्शन प्राप्त करावे, असे आवाहन फेडरेशनचे सचिव श्री चंद्रशेखर पुनाळेकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क असून कार्यक्रमासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल क्रमांक 8999194290 किंवा 9404344601 या क्रमांकावर मेसेज अथवा संपर्क करून नाव नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page