अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर कारवाई करा

दोडामार्ग शिवसेनेची पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी*

⚡दोडामार्ग,ता.०५-:* तालुक्यात अंमली पदार्थ पुरवणा-या टोळीवरतत्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने (शिंदे गट )जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, गेल्या आठवडयात दोडामार्ग तालुक्यात अंमली पदार्थ सेवन करताना दोघा तरुणांना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे जिल्हयात खळबळ उडाली होती.तालुक्यात मोठया प्रमाणात तस्कर दिवसाढवळया अमली पदार्थ पुरवितात आणि विकणारे राजरोस विकतात त्यामुळे युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची भीती आहे.सीमेलगत असलेल्या गोवा राज्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचे कनेक्शन असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.त्यावर पोलिस विभागाचे लक्ष असणे फार महत्त्वाचे आहे. पोलिस यंत्रणेने योग्य वेळी कारवाई नाही केली तर या भागातील युवापिढीचे भवितव्य धोक्यात येणार आहे. तरुण पिढी व्यसनाधिन होण्याची भीती आहे. गोव्यातून तालुक्यात येणाऱ्या अनेक चोरवाटा आहेत. त्यामुळे या भागातून जिल्हयात अंमली पदार्थ येत असल्याची दाट शक्यता आहे. त्या चोरवाटांवर पोलिसांनी नजर ठेवावी. बंद पोलिस तपासणी नाकी सुरू करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,शैलेश दळवी,गोपाळ गवस,भगवान गवस,योगेश महाले,रामदास मेस्त्री आदींच्या सह्या आहेत.

You cannot copy content of this page