⚡मालवण ता.०५-: लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ आणि एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकाविले. तर महिलांच्या गटात होलिक्रॉस सावंतवाडी संघाने विजयी मिळविला.
या स्पर्धेत पुरुष गटात पंचक्रोशी फोंडा संघ उपविजेता ठरला. तर तृतीय क्रमांक यंगस्टार कणकवली व चतुर्थ क्रमांक लक्ष्मीनारायण वालावल संघाने मिळविला. तसेच उत्कृष्ट पकड – किर्तेश परब (महापुरुष रेवतळे), उत्कृष्ट चढाई – जतीन कांबळी (महापुरुष रेवतळे) अष्टपैलू खेळाडू – अमित चव्हाण (फोंडा पंचक्रोशी) यांना गौरविण्यात आले. तर महिलांच्या गटात एस. एम. सिंधुस्पोर्ट कुडाळ संघ उपविजेता ठरला.
विजेत्या महापुरुष रेवतळे संघास ११, १११ रू. व चषक व उपविजेत्या फोंडा संघास ६,६६६ रू. व चषक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी रू. १५०० देऊन गौरविण्यात आले. तर महिला गटात विजेत्या सावंतवाडी संघास ३३३३ रू. व चषक आणि उपविजेत्या कुडाळ संघास २२२२ रू. देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी लायन्स क्लबचे मालवण अध्यक्ष विश्वास गावकर, मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, गणेश प्रभूलीकर, वैशाली शंकरदास, बाळू अंधारी, राजा शंकरदास, शांती पटेल, हरी चव्हाण, उमेश शिरोडकर, सौगंधराज बादेकर, विनोद शंकरदास, नितीन हडकर, रेनोल्ड बुतेलो आदी व इतर उपस्थित होते.
