⚡मालवण ता.०५-: आचरे येथिल वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या नावाने यावर्षी पासून प्रथमच सुरू करण्यात आलेला कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांना संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रोख रक्कम पाच हजार, सन्मान पत्र ,शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वितरीत करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश हडकर, संचालक राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, वामन आचरेकर, डॉ प्रमोद कोळंबकर, चंद्रकांत कुबल, मनोहर वाडेकर, दिलिप कावले,पाडूरंग वायंगणकर, प्रकाश मेस्त्री, संतोष गावकर, स हेमांगी खोत,सौ रागिणी ढेकणे ,यासह मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, विनायक परब,अशोक कांबळी, जयप्रकाश परुळेकर, यांसह पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुरेश ठाकूर यांनी श्रीकांत सांबारी यांनी आखून दिलेल्या मापदंडानुसार संस्थेचा कारभार चालल्यास संस्थेचा उत्कर्ष महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त रकमेत स्वतः एक हजार एकशे अकरा रुपये मिळवून खरेदी केलेली ग्रंथसंपदा श्रीकांत सांबारी स्मृती ग्रंथ म्हणून रामेश्वर वाचनालयास सुपुर्द करणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
