‘रावणाच्या गर्वहरण’ देखाव्याने डोळ्यांचे फिटले पारणे

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात
महापुरुष मित्रमंडळाचा चलचित्र देखावा लक्षवेधी

⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सोमवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाचा ‘रावणाचे गर्वहरण’ हा चलचित्र देखावा लक्षवेधी अन् डोळयांचे पारणे फिटणारा ठरला. बाजारपेठेतून काढलेल्या देखावादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विठूच्या नामाचा केलेला गजर आणि त्याला मिळालेल्या ढोल- ताशांमुळे सारा आसमंत दुमदुमून गेला.या देखाव्याचे सादरीकरण सुरु होताच क्षणार्थात मोबाईल कॅमेरे तो क्षण टिपण्यासाठी सरसावले. देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.


काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावणी महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व भजनांचे पार पार पडत आहेत. शहरातील विवीध मंडळांनी चलचित्र देखावे काढले. सोमवारी सप्ताहाच्या सहाव्या रात्री महापुरुष मित्रमंडळाने ‘रावणाचे गर्वहरण’ हा पौराणिक चलचित्र देखावा शहरातून काढून देखण्या कलेचे सादरीकरण केले. लंकेश हट्टापायी भगवान शंकरला आपल्या लंकेत नेण्यासाठी कैलास पर्वतावर गेलेला असतो. त्यावेळी शंकर व पार्वती बसलेला पर्वत लंकेश आपल्याकडे असलेल्या दैवीशक्तीच्या जोरावर अर्ध्याहून अधिक पर्वत उचलतो, तेव्हा शंकर पर्वतावर पायाच्या भाराने, तो रोखतो यात लंकेशाचे दोन्ही हात अडकता. वर्षानुवर्षे लंकेश त्याच स्थितीत असतो, अखेर लंकेशाला गर्वहरणाची जाणीव होते, त्यावेळी तो शंकराची आराधना करीत प्रसन्न करतो, त्यानंतर शंकर प्रसन्न होऊन काही पर्वत उंच करताच क्षणी पर्वताखाली अडलेले लंकेश आपले हात बाहेर काढतो आणि शंकराच्या चरणी नस्तमस्तक होताचक्षणी शंकर प्रसन्न होऊन दशानंद व लंकेशला यापुढील काळापासून तुला रावण नावे ओळखले जाईल, असे वरदान देतो.या कथेवर आधारित असलेल्या चलचित्र देखाव्यात रावणाची भूमिका – अमजद शेख, शंकर- कु.ऋषिकेश पाटील,
पार्वती- कु.याज्ञवी कोदे, गणेश – कु. साईल पोटफोडे, नंदी- बाळू वालावलकर यांन ह्या भूमिका साकारात उपस्थितांची वाहवा मिळवली.
शहरातून काढलेल्या चलचित्र देखाव्यादरम्यान महापुरुष मित्रमंडळाच्या कार्यर्त्यांनी विठूच्या नामाचा गजर करतानाच त्यांना मिळालेली ढोल-ताशांची साथीमुळे सारा असंमत दुमदुमून गेला होता. या देखाव्यांचे अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत फोटो देखील काढले, तर काहींनी व्हिडोओ कॉलच्या व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला देखाव्याचे दर्शन घडविले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत हा देखावा ‘याची देही याची, याची डोळा’ पाहिला. यात महिला व बालकांची गर्दी लक्षणीय होती. या सप्ताहाची बुधवारी दुपारी शहरातून नगर प्रदक्षिणा आरती व त्यानंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे.

You cannot copy content of this page