मंत्री दिपक केसरकर: मी कुणाला अडवले नाही;चुकीचा संदेश दिला जातोय..
⚡दोडामार्ग ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आले पाहिजे यासाठी आपण अनेकांना आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू करा असे आवाहन करत आहेत.आपण कुणालाही उद्योग सुरू करु नका असे सांगितले नाही. याठिकाणी जागा उपलब्ध आहे. काही भूखंड दिले गेले आहेत. त्यांनी पैसे भरून आपले उद्योग सुरू केले पाहिजे, आपण कुणाला विरोध केला नाही.तरीही आपल्या विरोधात चुकीचा संदेश दिला जात आहे,असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. दोडामार्ग तालुक्यातील काही सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, चाकरमानी यांनी मंत्री केसरकर यांची शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मुंबई येथील दालनात भेट घेतली.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत पण उपस्थित होते.
आडाळी विकास कृती समितीच्या वतीने रविवारी लाॅंग मार्च आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ती बैठक होती.
शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, , राजेंद्र निंबाळकर,
मोरगाव सरपंच ,आडाळी माजी सरपंच मधुकर उर्फ नंदू गावकर, सरपंच संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, गोपाळ गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, पिकुळे सरपंच आपा गवस, कोलझर
उगाडे सरपंच सुजल गवस, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, सासोली सरपंच संतोष शेटये, झोळंबे माजी सरपंच राजेश गवस, दोडामार्ग शिवसेना शहर प्रमुख योगेश महाले,युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस,
चंद्रकांत गावकर, कुंब्रल सरपंच जनार्दन गोरे, बाबाजी देसाई, पाडलोसकर, मनोज परब,
आत्माराम गावकर, राजन मोर्यें आदी उपस्थित होते.
चर्चेवेळी मंत्री केसरकर म्हणाले, आडाळी औद्योगिक क्षेत्र येथे भूखंड वाटप झाले आहे. या ठिकाणी त्यांनी पैसे भरून आपले उद्योग सुरू केले पाहिजे आपण कुणालाही अडवले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग आले पाहिजे यासाठी आपण अनेक उद्योजक यांना आडाळी येथे चला असे सांगत आहे. रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहे. एका कंपनीला येथे जागा दाखवली. शिवाय ग्रीन हायड्रोजन, चष्मा कंपनी, सोलर पॅनल यासाठी पन्नास एकर जागा पाहिजे होती.तीही दाखवली. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी पाणी हवे आहे. तेव्हा येथून गेलेली जलवाहिनी दाखवली, पडवे माजगाव जागा दाखवली.
आडाळी औद्योगिक क्षेत्र येथे काही ठिकाणी प्लाॅटिंग करायचे आहे.ती जबाबदारी त्या खात्याची आता. त्यांनी पार पाडली पाहिजे. आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू झाले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. औद्योगिक क्षेत्र यांचे खाते वेगळे आहे. त्यांची यंत्रणा वेगळी आहे. बांदा येथे मोठा उद्योग सुरू होणार आता असेही ते म्हणाले.
