⚡वेंगुर्ला ता.०९-: तुळस-पलतड येथे बांधण्यात आलेली विहिर व पंपशेडीचे काम निकृष्ट प्रतिचे झाल्याने पावसात नुकसान झाले. या बांधकामास निकृष्ट प्रकारचे स्टील व बांधकाम झाल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामस्थांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिले आहे.
या विहिरीच्या कामाची पहाणी अर्चना घारे यांनी केली. यावेळी प्रांतिक सदस्या नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. या कामाबाबत ग्रामसेवक यनी पंचयादी न घातल्यामुळे त्यावर बीडीओ यांच्याशी बोलणी केली. संबंधित अभियत्यांनी हे काम बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना भेटून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही घारे-परब यांनी दिली.
