जुनाट चालीरिती मोडून प्रगती साधा-सुनिल नांदोसकर…

⚡वेंगुर्ला ता.०९-: पालकांनी आपल्या वर्तणुकीने मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. विकासाच्या आड येणा-या जुनाट चालीरिती मोडून इतर समाजातल्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि प्रगती साधावी असे आवाहन जे.जे.आर्टस्चे निवृत्त प्राध्यापक आणि चित्रकार सुनिल नांदोसकर यांनी केले.


वेंगुर्ला तालुका तेली समाज उन्नत्ती मंडळाच्यावतीने ज्ञातीतील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दाभोली ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पेडणेकर, शुभदा डिचोलकर यांच्यासह ज्ञातीबांधव भगिनी उपस्थित होते. दाभोली महिला मंडळाने आयोजित केलेल्या या सोहळ्यास सुधीर डिचोलकर, प्रकाश आरोलकर, महादेव आरोलकर, वामन आरोलकर आदींचे सहकार्य लाभले.
फोटोओळी – तेली समाज उन्नत्ती मंडळाच्यावतीने ज्ञातीतील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

You cannot copy content of this page