वेंगुर्ला पोलीसांनी पकडली शिकारीसाठी वापरली जाणारी अनधिकृत बंदुक…

⚡वेंगुर्ले ता.०९-: अणसुर वादळवाडी येथे मंगेश भिकाजी गावडे, रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला हा त्याच्या रहात्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला बंदुकीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

वेंगुर्ला पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्रौ अणसुरपाल भागात सापळा रचला होता. ८ वाजण्याच्या सुमारास मंगेश गावडे बंदूक घेऊन शिकारीला जाताना आढळून आला. याच्याकडून अनधिकृत बंदुक व त्यातील जिवंत काडतूस जप्त केलेले आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, मपोकॉ चौहाण, पोहवा विठठल धुरी, पोकॉ अमर कांडर, पोकॉ पांडुरंग खड़पकर, पोहवा/ सुरेश पाटील यांनी केलेली आहे. पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page