कंत्राटी कामगारांना सेवेत न घेतल्यास आंदोलन

वामन कांबळे: नगरपरिषदेला दिले निवेदन

वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची ज्यांनी काहजी घेतली, त्यांच्या जागी नविन कर्मचा-यांची भरती करण्यात आली ही बाब खेदाची आहे, अशा कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांना १३ ऑगस्ट पासून पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा १५ ऑगस्ट रजी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा स्वतंत्र म्युन्सिपल कामगार युनियनचे सिधुदुर्गचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी वेंगुर्ला

नगरपरिषदेला दिला आहे. कोरोनात शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सेवा केली. त्यांनाच घरी बसवले व त्यांच्या जागी नविन कर्मचा-यांची भरती केली. १३ ते १४ कंत्राटी कर्मचारी कामाच्या प्रतिक्षेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page