सिंधुदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.०४-: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत व महसूल दिन सप्ताहाच्या अनुषंगाने मालवण येथील तहसील कार्यालय व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबीर तसेच मतदार जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नवमतदार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये एकूण ८८ विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. पी. खोबरे यांनी केले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. के. के. राबते, महसूल सहाय्यक के. के. मांजरेकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर पी. एन. नागवेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page