साद फाउंडेशन आयोजित, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आगामी झेड पी, तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल होणार मार्गदर्शन.

⚡बांदा ता.०४-: रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30वा आगामी झेड पी ,तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती वेळेवर मिळावी आणि त्यातून जिल्ह्याच्या प्रशासनात स्थानिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी मोफत मार्गदर्शन शिबीर साद फाउंडेशन सिंधुदुर्ग या नोंदणीकृत संस्थेच्या मार्फत घेतलं जाणार आहे.

या संस्थेच्या अध्यक्षा तसेच प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम फ्लोरेट कॉलेज,कणकवली कॉलेज जवळ,कॉलेज रोड,कणकवली येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी 9960658458 या नंबरवर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page