भालावल ते कोनशी रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करा…

ग्रामस्थांची मागणी ; पुंडलिक दळवी याच्या माध्यमातून दिले बांधकामाला निवेदन..

⚡सावंतवाडी ता.०४-:
भालावल ते कोनशी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकामकडे वर्ग करुन घ्या अशी मागणी आज तेथील ग्रामस्थांनी जिल्हापरिषद बांधकामाचे उपअभियंता डि एल ठाकरे यांच्याजवळ केली.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून त्यांनी आज शाखा अभियंता सुहास टेमकर यांच्याजवळ याबाबतचे निवेदन दिले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की,भालावल कोनशी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाकडे आहे या रस्त्याच्या डागडूजीबाबत होणारे दुर्लक्ष लक्षात घेता ग्रामस्थांकडून हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग व्हावा यासाठी गेली काही वर्ष पाठपुरावा सुरु आहे मात्र यात चालढकलपणा सरु आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली झाडी अपघाताला निमंत्रण देत आहे आज अखेर कोनसी उपसरपंच नाना उर्फ अर्जुन सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री दळवी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावंतवाडीचे उप अभियंता श्री ठाकरे यांना निवेदन सादर केले यावेळी त्यांनी रस्त्याकडे झालेले दुर्लक्ष व येणाऱ्या अडचणी बाबत संबंधित उपस्थित शाखा अभियंता श्री टेमकर यांचे लक्ष वेधले दरम्यान रस्त्यावर वाढलेली झाडी सोडून देण्यात येईल असे आश्वासन श्री टेमकर यांनी ग्रामस्थांना दिले.
राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस हिदायत उल्ला खान ,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिका राजगुरू, कोणाशी बूट अध्यक्ष सिद्धेश गवस, विठ्ठल गवस ,दिलीप गवस ,सुनील सावंत ,अनिल गवस ,दीपक गवस ,भरत सावंत, प्रवीण सावंत ,सुभाष गवस, आधी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page