कोंडये येथे गोठा तर तरंदळे कुंदेवाडी रस्त्यावर झाड कोसळले

⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. कोंडये येथील बाळकृष्ण पुंडलिक धोपटे यांचा जनावरांचा गोठा वादळी वाऱ्यासह पावसामुळे पडून ४० हजारांचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.तर तरंदळे कुंदेवाडी येथे झाड पडून वाहतूक बंद होती.अखेर तलाठी श्रीमती कडूलकर यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page