कणकवली – नरडवे मार्गावर एसटी- दुचाकी भीषण अपघातात दोघे ठार

⚡कणकवली ता.०६-: कणकवली – नरडवे मार्गांवरील
कणकवली रेल्वे स्टेशन नजिक शिवशकीनगर येथे एस.टी. बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सागर मारुती घाडीगावकर (२७,रा. हरकुळ, बोंडकवाडी )व सुनील सूर्यकांत ठाकूर(४५,रा. हरकुळ, काळेथरवाडी )या दोघांचे अपघाती निधन झाले आहे. हा अपघात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,हरकुळ बुद्रूक येथील सुनील ठाकूर आणि सागर घाडीगावकर दुपारी कणकवलीत आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये उपजिल्‍हा रूग्‍णालय येथे भांडण झाले. तेथील रिक्षा चालकांनी भांडण मिटवून त्‍यांना आपल्‍या घरी जाण्यास सांगितले. त्‍यानंतर दुचाकीवरून ते भरधाव वेगाने हरकूळच्या दिशेने निघाले. कणकवली रेल्‍वे स्थानकाचा पूल ओलांडून पुढे जात असताना कनेडी ते कणकवली अशी येणाऱ्या एस.टी. बसला त्‍यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही बसला आपटून रस्त्याकडेला दुचाकीसह फेकले गेले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. दरम्‍यान त्‍यांना स्थानिकांनी तातडीने उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले असता रूग्‍णालयातील डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे सांगितले.

अपघाताचे वृत्त समजताच सरपंच बंडू ठाकूर, पंचायत समिती माजी सभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,समीर ठाकूर ,मनीष ठाकूर, पोलीस पाटील संतोष तांबे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

You cannot copy content of this page