वेताळ बांबार्डे येथील सर्व्हिस रोड नजीक आहे झाड
⚡कुडाळ ता.०६-: मुंबई – गोवा महामार्गावरील
वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडी जवळच्या सर्व्हिस रोडनजिक असलेले मोठे झाड धोकादायक बनले आहे. हे झाड पूर्णतः सुकलेले असून याची उंची जास्त आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला असून हे झाड सर्व्हिस रोड किंवा महामार्गावर पडू शकते. हे झाड वाहने किंवा पादचारी यांच्यावर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. हे सुकलेले झाड तोडण्याबाबत अनेकदा महामार्ग ठेकेदार कंपनीला स्थानिक नागरिकांनी सूचना दिल्या. पण याबाबत ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही दुर्घटना घडू नये म्हणून हे तत्काळ तोडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
