कणकवली ते किर्लोस गाडीच्या बंद फेऱ्या पुन्हा सुरु

माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

⚡मालवण ता.०६-: कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित तीन फेऱ्या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. सदरील बाब येथील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या तिन्ही बसफेऱ्या तत्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

सदरील बाब ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी संपर्क करून कणकवली ते किर्लोस गाडीच्या सर्व फेऱ्या तत्काळ सुरु करण्याची सुचना केली होती. त्यानुसार बसच्या सर्व फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या फेऱ्या सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थी वर्गाने समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page