⚡कणकवली ता.०६-: ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेमधील इयत्ता दुसरी मधील प्रज्वल प्रसाद मसुरकर याने १७८ गुण संपादन करून कनेडी केंद्रात प्रथम क्रमांक तर प्रशालेतील सारा महेंद्र तांबे या विद्यार्थिनीने १७२ गुण संपादन करून कनेडी केंद्रात द्वितीय येण्याचा मान पटकावला.
कुमार प्रज्वल आणि सारा यांच्या या सुवर्णमय यशानिम्मित ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे मार्फत मेरिट सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच या विद्यार्थांना प्रशालेतील मुख्याध्यापक सुनिल गावकर , पदवीधर शिक्षक श्री.के पी सावंत यांच्या हस्ते तर ज्येष्ठ शिक्षिका सौ. गावकर , उपशिक्षिका सौ. प्रांजली मसुरकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.या विद्यार्थांना वर्गशिक्षिका सौ प्रांजली मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रशालेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक मेस्त्री आणि सदस्य,नरडवे केंद्रप्रमुख विजय भोगले, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमार्फत अभिनंदन करण्यात येत आहे.
