⚡कणकवली ता.०६-: कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित 3 फेर्या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर निलेश राणे यांनी तात्काळ एसटी प्रशासनाशी संपर्क साधत फेर्या सुरू करण्याची सूचना केल्याने गैरसोय दूर झाली असल्याची माहिती किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर यांनी दिली.
माजी खासदार निलेश राणे यांनी तत्काळ एसटी विभागात संपर्क करून कणकवली ते किर्लोस गाडीच्या सर्व फेऱ्या सुरू करण्याची सूचना केली व त्यानंतर आज बसच्या सर्व फेर्या सुरू करण्यात आल्या.बसच्या फेर्या सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थी वर्गाने समाधान व्यक्त केले.
