समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत फुटबॉल स्पर्धा

⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 8 व 9 जुलै रोजी विद्यामंदिर हायस्कुल च्या पटांगणावर संपन्न होणार आहे.

प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु.5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रवेश फी 800 रु असून इच्छुक स्पर्धक संघांनी प्रज्ञेश मोबा. 9158925653, मनीष 9011095888 यांच्याशी संपर्क
साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page