तिलारीनगर येथे ट्रक कलंडला

सुदैवाने जीवितहानी नाही

⚡दोडामार्ग ता.०६-: तिलारीनगर येथील एका चढतीवर लोखंडी ट्युब घेवुन जाणार ट्रक चढत नसल्याने चालकाने तो परत खाली घेण्याचा प्रयत्न करत असताना आताच नवीन केलेल्या साईटपट्टीत जावुन रुतला व एका थोडासा कलंडल्यासारखा झाला परंतु सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
हा ट्रक तामिळनाडु येथील असल्याचे समजते या पुर्णपणे लोखंडी ट्युब भरल्या होत्या तो तिलारीघाट मार्गे दोडामार्गच्या दिशेने जात होता परंतु यात जास्त लोखंड असल्याने या चढतीवर चढु शकला नाही.परंतु हा ट्रक तिलारीघाटात आला असता तर यात असणार्‍या ओव्हरलोटमुळे कोणताही प्रसंग घडला तर यामुळे वाहतुक देखील बंद झाली असती.गुगल मँपव्दारे हा जवळचा रस्ता दाखवत असल्याने वाहनचालक येथुनच प्रवास करणे सोईचे समजतात परंतु अवजड वाहने याठीकाणाहुन आल्याने याचा माञ एसटी बस मधील प्रवाशांना देखील करावा लागतो त्यामुळे अवजड वाहने याठीकाणाहुन येवु नये यासाठी सबंधित विभागाने उपाय योजना करणे गरजेचे आहे तर अशी मागणी देखील सर्वांकडुन होत आहे.

You cannot copy content of this page