Headlines

तरुणाईच्या गळ्यातील ताईत लावणी क्वीन गौतमी पाटील सिंधुदूर्ग च्या प्रेमात

इन्सुली घाटीत केले फोटो सेशन

बांदा ता.०६-: आपल्या नृत्यविष्काराने व सौन्दर्याने रसिकांच्या मनावर भुरळ घालणारी लावणी क्वीन गौतमी पाटील सिंधुदुर्गतील निसर्गाच्या प्रेमात पडली आहे. सावंतवाडी येथून गोव्यात कार्यक्रमासाठी जाताना इन्सुली घाटात काही काळ थांबून तिने फोटोसेशन केले.


सिंधुदुर्गचे निसर्ग सौन्दर्य हे अवर्णनीय आहे. त्यामुळे येथील पर्यटन स्थळांची सर्वांनाच भुरळ पडते. आपल्या आलिशान मोटारीतून सावंतवाडी येथून गोव्याच्या दिशेने जाताना गौतमी पाटील हिला इन्सुली घाटीत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तिने थेट रस्त्यावर उतरत १० मिनिटे येथे फोटोशेसन केले. त्यानंतर ती गोव्याच्या दिशेने रवाना झाली.

You cannot copy content of this page