लठ्ठपणा कमी करण्यासाठी ११ जुलै पासून योग वर्ग

पतंजली योग समितीचे मोफत आयोजन

बांदा/प्रतिनिधी
पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती बांदा यांच्यावतीने लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी ११ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोफत योगवर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ५.३० ते ७ व सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.
बांदा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर (मो. 9823881712), संजय नाईक (मो. 7038879174) किंवा अभय सातार्डेकर (9423311553) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page