विभाग नियंत्रकाच्या लेखी आश्वासनाअंती माघार; मात्र परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन
⚡सावंतवाडी ता.०५-: एस टी स्थानकाची झालेली दुरावस्था आणि प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन व प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी आज येथील बसस्थानकामध्ये तब्बल पाच तास या आंदोलन केले अखेर याची दखल घेत विभाग नियंत्रकाकडून येत्या 18 जुलै अगोदर साधकातील खड्डे आणि इतर समस्या दुर करण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
तर येथील एसटी स्थानकाच्या एकूणच परिस्थितीला स्थानिक आमदार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत त्यामुळे दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे परिस्थिती नाही सुधारली तर केसरकर यांच्या वाढदिनी रास्ता रोको आंदोलन करून एसटी बसेस रोखले जातील असा इशाराही श्री साळगावकर यांनी दिला.
